Best Residential areas to buy 1 & 2 BHK apartments in Pune

जर तुम्ही पुणे शहरांमध्ये राहत असाल आणि तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की फ्लॅट घेण्यासाठी चांगला एरिया कोणता आहेत म्हणजेच Best Residential areas to buy 1 & 2 BHK apartments in Pune तर आजच्या या लेखामध्ये आपण पुण्यामधील काही चांगल्या एरियाची माहिती घेणार आहोत जिथे तुम्ही स्वतःचे घर घेऊ शकता.

पुण्याचा शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्टीकोणातून चांगला विकास झालेला आहे आणि त्यामुळेच पुण्यामधील रिअल इस्टेट मार्केट प्रचंड वेगाने वाढत आहे म्हणूनच अनेक गुंतवणूकदार पुण्यामध्ये स्वतःची जमीन घेण्याकडे प्राधान्य देतात तसेच जे व्यक्ती नोकरी करतात त्या व्यक्तींना पुण्यामध्ये स्वतःचे घर घेऊन राहणे जास्त परवडते म्हणूनच रियल इस्टेटला मागणी वाढत आहे.

Best Residential areas to buy 1 & 2 BHK apartments in Pune

मुख्य पुणे शहराबरोबरच त्याच्या आजूबाजूच्या शहरांचा देखील चांगला विकास झालेला आहे आणि पुण्याला लागून असलेली गावे चांगली विकसित होत आहेत. विद्यार्थ्यांपासून ते अनेक नोकरी करणारे व्यक्ती पुण्यामध्ये रेंट ने किंवा विकत फ्लॅट घेऊन राहणे पसंत करतात. अशा वेळेस जर तुम्हाला देखील पुण्यामध्ये शिफ्ट पाहिजे असेल तर तुम्ही पुढील एरिया चा विचार करू शकता.

तळेगाव – Affordable flat buy

पुण्यामधील तळेगावला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे आणि त्याचबरोबर मागील दशकापासून तळेगावचा विकास चांगला झालेला आहे. अनेक शहरांना जोडलेल्या तळेगाव मध्ये अजून देखील काही ठिकाणी रियल इस्टेटच्या संधी उपलब्ध आहेत जेथे तुम्ही फ्लॅट खरेदी 1 & 2 bhk flat buy करू शकतात. तळेगाव मध्ये मुख्यतः मुंबई, पुणे आणि नाशिक हायवेमुळे तयार झालेल्या ट्रँगल मधील क्षेत्राला चांगली मागणी वाढलेली आहे.

तळेगाव हे मुंबईपासून दोन तासांच्या अंतरावरती आहे आणि पुण्यापासून फक्त 45 मिनिटांच्या अंतरावरती आहे. तळेगाव हे औद्योगिक क्षेत्रातील शहरांशी देखील चांगले जोडले गेलेले आहे आणि तळेगाव मध्ये विविध ऑटोमोबाईल कंपन्या आणि इतर महत्त्वाच्या कंपन्या देखील आहे ज्यामध्ये जेसीबी, फोक्सवॅगन, जनरल मोटर्स, बजाज आणि लँड रोव्हर सारख्या कंपन्यांचा समावेश होतो.

तळेगाव मधील फ्लॅटच्या किंमतींचा विचार केला तर त्या जवळपास पुण्याच्या फ्लॅट किमतीने इतक्याच आहेत परंतु चांगले सोशल नेटवर्क आणि दळणवळण च्या दृष्टीने चांगले असलेले तळेगाव येथे मागील काही वर्षांपासून रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी वाढ झालेली आहे. तळेगाव येथे विविध कंपन्यांमार्फत नवनवीन प्रोजेक्ट चे काम सुरू आहे.

बाणेर – Best ROI on flat

पुण्याच्या उत्तर पश्चिमेला असलेल्या बाणेर येथे आयटी सेक्टर मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे आणि त्याचबरोबर घरगुती रियल इस्टेट प्रॉपर्टी देखील जोर घेत आहेत आणि संबंधित एरियामध्ये घरांसाठी केलेल्या गुंतवणुकी वरती चांगला परतावा मिळत आहे म्हणूनच अनेक गुंतवणूकदार बाणेर शहराला गुंतवणूक करण्यासाठी पसंती देतात.

बाणेर हे पुणे शहराच्या तुलनेमध्ये कमी प्रदूषित आणि जास्त हिरवेगार आहे. बाणेर शहराचे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ला चांगली कनेक्टिव्हिटी आहे आणि त्यामुळे दूरचा प्रवास करणे सोपे होते. बाणेर येथे विविध शैक्षणिक संस्थांने, मॉल, हेल्थकेअर सेंटर, रेस्टॉरंट आणि विविध किराणामाल दुकान आहे त्याच्यामुळे गरजेच्या वस्तू घेणे सोपे होते. बाणेर हे हिंजवडी आणि शिवाजीनगर पासून जवळच आहे तसेच बाणेर पासून एअरपोर्ट हे अवघे 18 किलोमीटर अंतरावर आहे.

कामशेत – Tourism industry area

खंडाळा आणि लोणावळा पासून 16 किलोमीटर असलेले थंड हवेचे ठिकाण कामशेत एक गुंतवणुकीसाठीचा चांगला विकल्प ठरू शकते. मुंबईपासून 110 किलोमीटर असलेले आणि पुण्यापासून 45 किलोमीटर असलेले कामशेत एक चांगले पर्यटन स्थळ आहे. कामशेत मधील पॅराग्लायडिंग देशभरात प्रसिद्ध आहे याचबरोबर हिल क्लाइंबिंग आणि इतर साहसी खेळांचे दर्शन आपल्याला कामशेत येथे बघायला मिळेल. पॅराग्राईटनिंग करत असताना पवना तलाव वरील दृश्य सुंदर दिसते.जर तुम्हाला 1 bhk flat in Pune फ्लॅट खरेदी करायचा असेल आणि आपले रिटायरमेंट नंतरचे आयुष्य निवांत घालवायचे असेल तर तुम्ही कामशेत येथे घर खरेदी करू शकता.

रहाटणी

रहाटणी हे पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर आहे आणि हिंजवडी पासून सात किलोमीटर अंतरावरती आहे काळेवाडी आणि पिंपळे सौदागर च्या मध्ये असलेले रहाटणी एक विकसित होत असलेला रहिवासी भूभाग आहे. रहाटणी हे राजीव गांधी इन्फोटेक पार्क पासून जवळच आहे आणि त्यामुळे रहाटणी येथे देशभरातून लोक राहण्यासाठी येतात. रहाटणी हे रस्त्यांच्या मदतीने विविध शहरांशी जोडलेले आहे आणि एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टेशनची चांगली सुविधा आहे. पुणे एअरपोर्ट हे जवळील एअरपोर्ट आहे आणि पिंपरी रेल्वे स्टेशन हे रहाटणी जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

हे पण वाचा:

मला आशा आहे Best Residential areas to buy 1 & 2 BHK apartments in Pune या विषयावरती तुम्हाला आजच्या आले का मध्ये संपूर्ण माहिती मिळालेली असेल जर तुम्हाला आजचा हा लेख आवडलेला असेल तर तुम्ही हा लेख नक्कीच शेअर करा आणि अशाच नाविन्यपूर्ण लेखांसाठी तुम्ही आमचे संकेतस्थळ लक्षात ठेवून वेळोवेळी करत रहा.

Leave a Comment