मुंबईमध्ये जमीन घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार , म्हाडा मार्फत नवीन योजनेची होणार आहे सुरुवात

MHADA Mumbai Plot: मागील काही वर्षांपासून मुंबईमधील रियल इस्टेट मार्केटने चांगली तेजी पकडलेली आहे. जगातील सर्वात महागड्या शहरांमध्ये आता मुंबईचा उल्लेख होतो त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मुंबईमध्ये घर घेणे जवळपास अशक्य झाले होते, परंतु त्यानंतर महाराष्ट्र सरकारने म्हाडा मार्फत सर्वसामान्य नागरिकांना घर उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली व त्यानंतर अनेक नागरिकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

म्हाडा जमिनीचे प्लॉट विक्री (MHADA Mumbai Plot Sell)

म्हाडाच्या मुंबई बोर्ड मार्फत आता प्लॉट विक्रीसाठी नवीन योजना आखणार असल्याचे समोर आले आहे. संबंधित प्लॉटची विक्री लिलाव पद्धतीने जो व्यक्ती अधिक दरामध्ये बोली लावेल त्या व्यक्तीला देण्यात आलेले आहे परंतु यामध्ये देखील काही अटी व शर्ती लागू असतील लवकरच या संदर्भामध्ये जाहिरात काढण्यात येणार आहे आणि या संदर्भामध्ये विविध एरियामधील म्हाडा ऑफिसरला माहिती देण्यात येणार आहे. ज्या एरियामध्ये जमिनीचा प्लॉट असेल त्या एरियानुसार जमिनीची बेसिक किंमत ठरवली जाणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र कमी व्याज दरात देत आहे होम लोन, आत्ताच चेक करा इंटरेस्ट रेट

मुंबईमधील म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित प्लॉट संदर्भात परीक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मागील बऱ्याच वर्षापासून म्हाडाचे काही प्लॉट हे खेळाचे मैदान, हॉस्पिटल तसेच इतर कार्यांसाठी पडित पडून होते पण आणि त्यावरती कोणतेही उपक्रम राबवण्यात येत नव्हते त्यामुळे संबंधित प्लॉटवर अतिक्रमणाचा धोका वाढत चालला होता आणि त्याच अनुषंगाने म्हाडा ने संबंधित जमिनीचे प्लॉट विकण्याचा निर्णय घेतला आहे.

सहाशे घरांसाठी लवकरच जाहिरात निघण्याची शक्यता

मागील वर्षाच्या ऑगस्ट 2023 मध्ये घरांसाठी जाहिरात काढण्यात आली होती परंतु यामधील 600 घरे अजूनही विकली गेलेली नाही त्यामुळे संबंधित घरासाठी लवकरच जाहिरात काढण्यात येणार आहे ही घरे मुंबईमधील वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मुंबईमधील म्हाडा लॉटरी मध्ये संबंधित घरांचा समावेश करण्यात येऊ शकतो.

Leave a Comment