Home Loan Banks: देशामध्ये या टॉप 5 बँका सर्वात कमी व्याजदरात होम लोन देत आहेत, जाणून घ्या व्याजदर

Home Loan Banks Rate: आपल्या देशामध्ये क्रेडिट स्कोर च्या आधारावरती होम लोन तसेच इतर प्रकारचे लोन दिले जाते आणि विविध बँकांचा होम लोन हा कमी अधिक प्रमाणात असतो त्यामुळे जिथे आपल्याला कमी व्याजदरामध्ये आणि इतर चार्जेस कमी असतील अशा बँकेमधून होम लोन घेतले तर आपला फायदा होऊ शकतो म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण भारतामधील टॉप पाच बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्यांच्यामध्ये होम लोन चा व्याजदर किती आहे हे बघणार आहोत.

आयसीआयसीआय बँक

जेव्हा आपल्या लोनचे अमाऊंट ही 35 लाखांपासून ते 75 लाखांच्या दरम्यान असते तेव्हा आपण आयसीआयसीआय बँकेचा होम लोन घेऊ शकतो आणि या होम लोन वरती आपल्याला 9.5 ते 9.8 टक्के व्याजदर द्यावा लागू शकतो. जर तुम्ही बिझनेस करत असाल आणि तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला सॅलरी पर्सन पेक्षा अधिक व्याजदर द्यावा लागेल. जेव्हा होम लोन ची अमाऊंट 75 लाखापेक्षा जास्त असते तेव्हा आपल्याला काहीसा अधिक व्याजदर द्यावा लागू शकतो.

भारतीय स्टेट बँक

स्टेट बँकेच्या माध्यमातून क्रेडिट स्कोरच्या आधारावरती होम लोन प्रदान केले जाते जेव्हा तुमच्याकडे क्रेडिट स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तेव्हा तुम्हाला होम लोन वरती 9.15 ते 9.55 टक्केपर्यंत व्याजदर द्यावा लागेल. जेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर 700 ते 749 पर्यंत असेल तेव्हा तुम्हाला 9.35 ते 9.75 टक्के पर्यंत व्याजदर द्यावा लागेल. तुमचा क्रेडिट स्कोर अधिक खराब असेल तर तुम्हाला दहा टक्के पर्यंत होम लोन व्याजदर भरावा लागेल.

एचडीएफसी बँक

8.9 ते 9.6 टक्केपर्यंत एचडीएफसी बँक मार्फत होम लोन वरती व्याजदर आकारला जातो. जेव्हा बँकेकडून स्पेशल ऑफर चालू असते तेव्हा आपण 8.55 पासून होम लोन घेऊ शकतो. सध्या MCLR मध्ये वाट करून एचडीएफसी बँकेने आपला व्याजदर दहा पॉईंट ने वाढवलेला आहे.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँक मार्फत जर तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल आणि तुमचा क्रेडिट स्कोर 800 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 8.40% व्याजदर भरावा लागेल. परंतु जर तुमचा क्रेडिट स्कोर हा 750 असेल तर तुम्हाला 9.45 टक्के व्याजदर भरावा लागेल. 700 ते 749 दरम्यानच्या क्रेडिट स्कोर मध्ये तुम्हाला 9.90% व्याजदर भरावा लागू शकतो. जर तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल आणि तुमची क्रेडिट हिस्टरी चांगली नसेल तर तुम्हाला 11 टक्के पर्यंत होम लोन व्याजदर भरावे लागू शकते.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा भारतातील एक लोकप्रिय बँक आहे या बँकेमधून जर तुम्ही होम लोन घेतले तर तुम्हाला साडेआठ टक्के पासून ते साडेदहा टक्के पर्यंत होम लोन व्याजदर भरावा लागू शकतो.

हे पण वाचा: होम लोनचा इन्शुरन्स घेतला पाहिजे की नाही, सविस्तर माहिती

नोट: वरती दिलेली माहिती इंटरनेटवर आधारित स्त्रोतांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे त्यामुळे यामध्ये विसंगती असू शकते तेव्हा होम लोन घेणे आधी संबंधित बँक अधिकाऱ्यांशी जरूर चर्चा करावी.

Leave a Comment