गृह कर्जासाठी आवश्यक दस्तावेज – Home Loan Documents in Marathi

Home loan documents in Marathi: जर तुम्हाला देखील होम लोन घ्यायचे असेल आणि तुम्हाला माहीत नसेल की यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे यामध्ये आम्ही तुम्हाला होम लोन साठी कोण कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे याविषयीची माहिती दिलेली आहे.

महाराष्ट्र मध्ये विविध बँक तसेच वित्तीय संस्थांना मार्फत होम लोन प्रदान केले जाते आणि संबंधित होम लोन हे सिबिल स्कोर च्या आधारे दिले जाते तसेच वेळोवेळी बँकांमार्फत होम लोन साठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात.

ज्या व्यक्तींचा सिबिल स्कोर हा 750 पेक्षा जास्त असेल त्यांना होम लोन घेताना कोणतेही अडचणींचा सामना करावा लागत नाही परंतु बऱ्याच वेळेस होम लोन घेत असताना आपल्याकडे काही प्रॉपर्टी गहाण ठेवण्यासाठी असेल तर लवकर कर्ज प्राप्त होते संबंधित प्रॉपर्टी ही सिक्युरिटी म्हणून कार्य करते.

Home Loan Documents in Marathi

कोणत्याही आवेदनकर्त्याला होम लोन घेण्यासाठी दस्तावेज प्रस्तुत करणे अत्यंत आवश्यक आहे संबंधित दस्तावेज हे तुमची ओळख तसेच केवायसी प्रक्रियेमध्ये मदत करतात. डॉक्युमेंट्स मुळे तुमचे आर्थिक व्यवहार करतात आणि आर्थिक पार्श्वभूमी माहीत होते.

कस्टमरच्या विविध प्रकारानसार जसे की NRI, व्यावसायिक, बिझनेस मॅन, सॅलरी पर्सन यांना वेगवेगळे डॉक्युमेंट बँकेत सबमिट करावे लागतात परंतु पुढे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहे जे मुख्यतः समान असतात:

 • तीन पासपोर्ट साईज फोटो
 • लोन अप्लिकेशन फॉर्म
 • ओळखीचा पुरावा
 • रहिवासी पुरावा
 • बँक स्टेटमेंट
 • प्रॉपर्टी डिटेल असलेले दस्तावेज
 • आवेदनकर्त्याची सही
 • सॅलरी स्टेटमेंट
 • दोन वर्षाचे आयटी रिटर्न (सॅलरी पर्सन)
 • तीन वर्षाच्या आयटी रिटर्न (बिझनेस पर्सन)
 • व्यवसायिक ठिकाण
 • फॉर्म चलन

होम लोन केवायसी प्रक्रियेसाठी डॉक्युमेंट

 • आयडी प्रूफ जसे की
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पॅन कार्ड, पासपोर्ट
  • मतदान कार्ड यांपैकी एक
 • कोणताही एक रहिवासी पुरावा जसे की
  • लाईट बिल
  • टेलिफोन बिल
  • रेशन कार्ड
  • पासबुक इत्यादी
 • वयाचा पुरावा जसे की
  • दहावीचे मार्कशीट
  • बारावीचे मार्कशीट
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट
  • पॅन कार्ड

SBI home loan documents in marathi

 • वैध ओळखपत्र
 • संपूर्ण लोन एप्लीकेशन फॉर्म तीन पासपोर्ट साईज फोटोसह
 • ओळखीचे प्रमाणपत्र जसे की ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदान कार्ड इत्यादी
 • रहिवासी पुरावा जसे की अलीकडील टेलिफोन बिल, लाईट बिल, पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इत्यादी
 • प्रॉपर्टी संबंधित डॉक्युमेंट
  • बांधकामाचे परवानगी (आवश्यकता असल्यास)
  • सेल चे रजिस्टर एग्रीमेंट
  • शेअर सर्टिफिकेट
  • अप्रूव झालेल्या वैध प्लॅन कॉपी
 • अकाउंट स्टेटमेंट
 • सॅलरी पर्सन साठी मागील तीन महिन्यांची सॅलरी स्लिप आणि मागील दोन वर्षांचा आयटी रिटर्न रिपोर्ट
 • सॅलरी पर्सन व्यतिरिक्त इतर व्यक्तींसाठी:
  • व्यवसायाचे ठिकाण
  • मागील तीन वर्षांचे इन्कम टॅक्स रिपोर्ट
  • व्यवसायाचे लायसन्स
  • बॅलन्स शीट
  • टीडीएस सर्टिफिकेट
  • बिजनेस लायसन्स डिटेल

HDFC home loan documents in marathi

 • केवायसी डॉक्युमेंट
  • पासपोर्ट
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड
  • जॉब कार्ड
  • आधार कार्ड
 • उत्पन्नाचा पुरावा
  • सॅलरी पर्सन
   • मागील तीन महिन्यांची सॅलरी स्लीप
   • मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
   • लेटेस्ट फॉर्म 16 आणि आयटी रिटर्न
  • सॅलरी पर्सन, स्वयंरोजगार तसेच व्यवसायिक
   • कमीत कमी दोन वर्षांचे इन्कम टॅक्स रिपोर्ट
  • स्वयंरोजगार तसेच व्यवसायिकांसाठी मागील बारा महिन्यांचे करंट अकाउंट स्टेटमेंट

आजच्या या लेखामध्ये आपण होम लोन साठी आवश्यक असलेल्या डॉक्युमेंट विषयाची माहिती प्राप्त करून घेतलेली आहे जर तुम्हाला देखील होम लोन घ्यायचे असेल तर तुम्ही वरील डॉक्युमेंट्स च विचार करू शकतात तसेच जर तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही खाली कमेंट च्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता.

तुम्हाला हे पण वाचायला आवडेल:

Home Loan Banks: देशामध्ये या टॉप 5 बँका सर्वात कमी व्याजदरात होम लोन देत आहेत, जाणून घ्या व्याजदर

Leave a Comment