जर तुम्ही जॉईंट होम लोन घेतले असेल तर आरामात वाचू शकता 7 लाख रुपये पर्यंतचे टॅक्स, जाणून घ्या कसे

सध्याच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना घर घ्यायचे असले तर त्याच्यासाठी मोठी रक्कम चुकावी लागते आणि बऱ्याच वेळेस आपल्याकडे सर्व पैसे कॅश स्वरूपात नसतात अशा वेळेस आपण होम लोन घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करत असतो.

परंतु होम लोन विषयी आपल्याला अधिक माहिती प्राप्त नसते परंतु जर तुम्ही आता जॉईंट होम लोन घेतलेले असेल तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि जवळपास सात लाख रुपयांपर्यंतचे टॅक्स तुम्ही वाचू शकता.

जर तुम्हाला होम लोन घेण्याचा विचार मनात तर चालू असेल तर तुम्ही जॉईंट होम लोन घेतले पाहिजे म्हणजेच पती आणि पत्नीच्या नावावरती होम लोन घेतले तर त्याचे वेगवेगळे फायदे बघायला मिळतात. इन्कम टॅक्स अॅक्टच्या सेक्शन 80C आणि सेक्शन 24(b) नुसार जॉईंट होम लोन मधील दोन्हीही आवेदन करणारे व्यक्ती टॅक्स बेनिफिट घेऊ शकतात.

सेक्शन 80C नुसार होम लोन घेणारी व्यक्ती दीड लाख रुपयांपर्यंतचे टॅक्स माफीसाठी चे अर्ज सादर करू शकतात आणि सेक्शन 24b नुसार एकूण लोन च्या अमाऊंटच्या दोन लाखांपर्यंत टॅक्स माफीसाठी अर्ज सादर करू शकतात. आणि अशाप्रकारे होम लोन घेणारे व्यक्ती लोनच्या साडेतीन लाख रुपयांपर्यंत टॅक्स माफीसाठीचे अर्ज सादर करू शकतात आणि याचा लाभ घेऊ शकतात आणि जर जॉईंट होम लोन घेतलेले असेल तर हीच रक्कम साडेतीन लाख आणि साडेतीन लाख अशी एकूण सात लाखापर्यंत होऊ शकते.

कोणाला मिळणार लाभ

होम लोन टॅक्स माफीसाठी जॉईंट होम लोनधारकांनी काही अटींचे पालन करणे गरजेचे आहे म्हणजेच जर तुम्ही कोणतेही प्रॉपर्टी खरेदी करत असाल तर त्यामध्ये जॉईंट होम लोन मधील व्यक्ती समान भागीदार असतील आणि याचबरोबर कर्जाचे परतफेड करत असताना पण दोन्ही पण व्यक्तींच्या माध्यमातून परतफेड झाली पाहिजे म्हणजेच दोन्ही पण कर्जाचे पण समान भागीदार असतील.

जर प्रॉपर्टी पेपर वरती दोन्ही व्यक्ती समान भागीदारातील परंतु कर्ज घेत असताना फक्त एकाच व्यक्तीच्या नावावरती कर्ज घेतलेल्या असेल तर अशा वेळेस तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. म्हणूनच कर्ज आणि प्रॉपर्टी दोन्हीकडे दोन्ही व्यक्ती समान भागधारक असले पाहिजेत.

जॉईंट होम लोनचे फायदे

  • जॉईंट होम लोनच्या विविध फायदे आहेत जर तुमचा क्रेडिट स्कोर खराब झालेला असेल आणि तुम्हाला लवकर कर्ज मिळत नसेल तर तुम्ही जॉईंट होम लोन घेऊ शकतात आणि तुमच्या बरोबरच्या व्यक्तीचा जर क्रेडिट स्कोर चांगला असेल तर त्यामुळे तुम्हाला पण कर्ज मिळण्यास सोपे जाईल.
  • जर कोणत्याही एका व्यक्तीने कर्ज घेतले तर त्याला त्याच्या उत्पनानुसार कर्ज प्रदान केले जाते परंतु जर जॉईंट लोन घेतलेले असेल तर दोन्ही व्यक्ती च्या एकूण उत्पन्नाच्या आधारे लोन प्रदान केले जाते आणि ज्यामुळे लोणची राशी ही जास्त होऊ शकते
  • जर होम लोन घेत असताना तुम्हाला कोणी महिला भागीदार बरोबर असेल तर तुम्हाला पाच बेसिक पॉईंट पर्यंतची होम लोन मधील व्याजदरामध्ये बचत होऊ शकते परंतु याचा लाभ घेण्यासाठी संबंधित महिला हे प्रॉपर्टी मध्ये भागीदार असणे गरजेचे आहे

अशाप्रकारे जर तुम्ही जॉईंट होम लोन घेणार असाल तर सात लाख रुपये पर्यंतचे बचत तुम्ही करू शकता परंतु हे करत असताना यासाठी विविध बँका मार्फत आणि वित्तीय संस्थांना मार्फत वेगवेगळ्या अटी आणि शर्ती लागू करण्यात आलेल्या असतात आणि याविषयीची अधिक माहिती तुम्ही बँक अधिकाऱ्यासोबत तसेच तुमच्या वित्तीय सल्लागार बरोबर बोलून मिळू शकतात.

Leave a Comment