MHADA Lottary Process: घर घ्यायचे आहे का? म्हाडा लॉटरी मधून अशा प्रकारे घर घ्या, वाचा संपूर्ण प्रोसेस

MHADA Lottary Process: अनेक व्यक्तींचे पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये घर घेण्याचे स्वप्न असते व संबंधित घर घेण्यासाठी ते होम लोन चा आधार घेतात परंतु होम लोनचा अधिक कालावधी आणि बिल्डर कडून कामाची क्वालिटी चांगली राहते जाईल की नाही याची शाश्वती नसते त्यामुळे बरेच व्यक्ती प्रायव्हेट बिल्डर कडून घर घेणे टाळतात.

अशा वेळेस म्हाडा कडून घर घेण्यास नागरिकांचे पसंती वाढत आहे जेव्हा म्हाडाची लॉटरी निघते तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो व संबंधित योजनेमध्ये राज्य सरकारचा सहभाग असल्यामुळे या योजनेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो व हजारो एप्लीकेशन प्राप्त होत असतात.

त्यामुळेच आजच्या या लेखांमध्ये आपण म्हाडा तसेच सिडको कडून घर घेण्यासाठी काय प्रोसेस असते व यासाठी काय पात्रता असते याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

म्हाडा कडून घर घेण्याची पात्रता

  • म्हाडा कडून घर घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असणे गरजेचे आहे
  • ज्या उमेदवाराचे वय कमीतकमी 18 वर्षे असेल असा उमेदवार म्हाडा कडून घर घेण्यासाठी पात्र असतो
  • जर तुमचे उत्पन्न जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये असेल तर तुम्ही कमी उत्पन्न गटामधून म्हाडा घरांसाठी अर्ज करू शकता
  • 50 हजार ते 75 हजार पर्यंत उत्पन्न असणाऱ्या उमेदवारांना मध्यम उत्पन्न गटामधून अर्ज दाखल करावा लागेल तर 75 हजार उत्पन्न पेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या उमेदवारांना उच्च उत्पन्न गटामधून अर्ज दाखल करावा लागेल.

आपण म्हाडा घरांसाठी भरलेली अनामत परत मिळते का?

जेव्हा आपण म्हाडा घरांसाठी अर्ज दाखल करत असतो तेव्हा आपल्याला संबंधित अर्जाबरोबर अनामत रक्कम द्यावी लागते. जर आपले उत्पन्न 50 हजार रुपयांपर्यंत असेल तर आपल्याला दहा हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम भरावे लागू शकते आणि जर तुम्हाला म्हाडाचे घर लागले नाही तर संबंधित अनामत रक्कम परत तुमच्या बँकेमध्ये जमा होते तसेच म्हाडाच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रोसेसिंग फी देखील घेतली जाते जी पाचशे रुपयांपर्यंत असू शकते व ही प्रोसेसिंग फी तुम्हाला परत वापस दिली जात नाही.

म्हाडाची लॉटरी मिळवण्यासाठी काही ट्रिक आहे का?

म्हाडा मधून लॉटरी पद्धतीने घर मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची ट्रिक उपलब्ध नाही कधी कधी काही हजार घरांसाठी म्हाडाचे लाखो अर्ज प्राप्त होतात त्यामुळे आपल्याला असे वाटते की आपण काही ट्रिक वापरून म्हाडाचे घर मिळवू शकतो का? जर तुम्ही काही विशिष्ट गटातील व्यक्ती असाल म्हणजेच जर तुम्ही गिरणी कामगार किंवा पत्रकार, पोलीस इत्यादी असेल तर तुम्हाला mhad घर मिळवण्यासाठी स्पेशल ऑफरचा लाभ घेता येऊ शकतो.

म्हाडामध्ये घराची लॉटरी लागली तर पुढे काय? mhada lottary process

जर तुम्हाला म्हाडामध्ये घराची लॉटरी लागली असेल तर पुढील स्टेप म्हणजे तुम्हाला एका आठवड्यामध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल व घराच्या एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम भरावी लागेल त्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र म्हाडा कार्यालयांमधून दिले जाईल ज्याच्या माध्यमातून तुम्ही बँकेमधून गृह कर्ज घेऊन आपले घराचे स्वप्न पूर्ण करू शकाल.

 

 

 

Leave a Comment